-
२०२२ हे वर्षं हिंदी चित्रपटांसाठी अजिबात चांगलं नव्हतं. काही ठराविक चित्रपट सोडले तर बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. आतासुद्धा येणाऱ्या बऱ्याच हिंदी चित्रपटांना बॉयकॉटचा सामना करावा लागतो आहे.
-
याउलट यावर्षी दाक्षिणात्य चित्रपट चांगलेच गाजले. ‘आरआरआर’, ‘केजीएफ चॅप्टर २’. ‘कांतारा’ ‘विक्रम’ अशा चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपटांना चांगलीच मात दिली. याचा अर्थ असा अजिबात होत नाही की दाक्षिणात्य चित्रपट सगळेच हीट ठरले. हिंदीप्रमाणेच तिथेही फ्लॉप चित्रपटांची रांग लागली आहे. खासकरून यावर्षी मल्याळम चित्रपट चांगलेच आपटले. मोहनलाल यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याचेसुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. त्याबद्दलच आपण जाणून घेऊयात.
-
मोहनलाल यांचा ‘आराट्टू’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. या चित्रपटातील पात्राचं मुख्य नाव आणि मोहनलाल हे समीकरण वगळता बाकी या चित्रपटाबाबत काहीही स्मरणात ठेवावं असं काही नाही.
-
ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झालेला ‘मॉनस्टर’ या चित्रपटातही मोहनलाल यांनी प्रमुख भूमिका साकारली. पण हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
-
मोहनलाल यांचा थेट ओटीटीवर प्रदर्शित झालेला ’12th man’ हा चित्रपटही फारशी कमाल दाखवू शकला नाही.
-
रोहन अँड्रूजचा ‘सॅटर्डे नाइट’ हा मल्याळम चित्रपटही फारशी कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा लोकांना होत्या.
-
पृथ्वीराज सुकुमारनच्या ‘कडूवा’ या चित्रपटाने ठीकठाक कमाई केली असली तर हा त्याचा सुपरहीट चित्रपट म्हणता येणार नाही. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकला.
-
‘ललीता सुंदरम’ हा चित्रपट बॉलिवूडच्या ‘कपूर अँड सन्स’सारखाच असला तरी बॉक्स ऑफिसवर मात्र हा चित्रपट दणकून आपटला.
-
जागतिक राजकारण आणि विचारधारेतील द्वंद्व यामध्ये अडकलेला पृथ्वीराज सुकुमारनचा ‘थीरप्पू’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित