-
बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान उद्या २७ डिसेंबरला त्याचा ५७ वाढदिवस साजरा करत आहे.
-
सलमान खानचा वाढदिवस हा त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदोत्सवच असतो.
-
सलमानला वाढदिवसानिमित्त लाखो चाहते त्याला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईतील गॅलेक्सी या घराबाहेर जमतात.
-
पण यंदा गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गर्दी करणाऱ्या सलमानच्या चाहत्यांनी निराशा होण्याची शक्यता आहे.
-
कारण यंदा सलमान खान त्याच्या वाढदिवशी मुंबईबाहेर असणार आहे. नुकतंच बिग बॉस हिंदीच्या मंचावरुन त्याने याबद्दलचा खुलासा केला आहे.
-
सलमान खान यंदा त्याचा वाढदिवस हा पनवेल येथील फार्महाऊसवर साजरा करणार आहे.
-
सलमान दरवर्षी त्याचा वाढदिवस याच फार्महाऊसवर साजरा करताना दिसतो.
-
यानिमित्ताने त्याचे हे फार्महाऊस आतून कसे आहे, याची माहिती आपण घेणार आहोत.
-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा बराच वेळा त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसतो.
-
तो तेथील फोटो सोशल मीडियावर देखील शेअर करत असतो.
-
लॉकडाऊनच्या काळात सलमानची बहिण अर्पिता, आयुष शर्मा, भाचा आहिल, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, लूलिया वंतूर, वलूशा डिसूजा हे फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसले होते.
-
लूलिया, वलूशा आणि जॅकलिनने सोशल मीडियावर सलमानच्या फार्महाऊसचे फोटो शेअर केले होते.
-
सलमानचा हा फार्महाऊस १५० एकरमध्ये वसलेला आहे.
-
सलमानच्या फार्महाऊसवर घोडे आहेत.
-
सलमान खानचे हे फार्म हाऊस फारच सुंदर आहे. हे फार्महाऊस निर्सगरम्य ठिकाणी वसलेले आहे.
-
या फार्महाऊसच्या मागे-पुढे सर्वत्र छान हिरवळ पाहायला मिळते.
-
सलमान खानच्या फार्महाऊसच्या आत तीन बंगले, पूल आणि घोडेस्वारी करण्यासाठी फार मोठी जागा आहे.
-
सलमान अनेकदा या ठिकाणी घोडेस्वारी करताना पाहायला मिळतो. या ठिकाणी अनेक घोडेही आहेत.
-
सलमान खानच्या या फार्महाऊसवर त्याच्या कुटुंबियांचे वाढदिवस, अलिशान पार्ट्यांचेही आयोजन केले जाते.
-
गेल्यावर्षी त्याची भाची आयत शर्माचा वाढदिवस त्यांनी याच फार्महाऊसवर साजरा केला होता.
-
विशेष म्हणजे यंदा त्याची आई सलमा यांचा वाढदिवसही याच ठिकाणी साजरा केला गेला.
-
तसेच सलमानने त्याच्या फार्महाऊसवर सायकल देखील ठेवली आहे.
-
फार्महाऊसवर सलमानने अनेक झाडे लावली आहेत.
-
तो या ठिकाणी शेतीही करताना दिसतो.
-
सलमानच्या फार्महाऊसवर ट्रॅक्टर देखील आहे.
-
लॉकडाउनच्या काळात तो सलमानच्या फार्महाऊसवर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवताना दिसत होता.
-
लॉकडाऊनच्या काळात वलूशाने ट्रॅक्टरवर बसून फोटो शेअर केला होता.
-
सलमानच्या या फार्महाऊसची किंमत जवळपास ८० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
लॉकडाउनच्या काळात तो सलमानच्या फार्महाऊसवर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवताना दिसत होता.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल