-
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही घराघरांत लोकप्रिय आहे. आज अपूर्वाचा वाढदिवस आहे.
-
छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चेत असलेला शो बिग बॉसमुळे अपूर्वा प्रसिद्धीझोतात आली.
-
या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते.
-
अपूर्वाचा जन्म २७ डिसेंबर १९८८ ला मुंबईच्या दादर येथे झाला.
-
अपूर्वा दादरमध्येच लहानाची मोठी झाली.
-
किंग जॉर्ज विद्यालयातून अपूर्वाने दहावीपर्यंचे शिक्षण घेतलं.
-
अपूर्वाच्या वडिलांचे नाव सुभाष नेमळेकर आहे. तर तिच्या आईचे नाव सुप्रिया नेमळेकर आहे.
-
अपूर्वाचं नॅशनल कॉलेज वांद्रे आणि त्यानंतर रुपारेल कॉलेज अशा दोन ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं.
-
कॉलेजमध्ये असतानाच अपूर्वाकडे मालिकेसाठी विचारणा झाली होती. मात्र तिने ती करण्यास नकार दिला होता.
-
अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता.
-
पदवीचं शिक्षण पूर्ण होत असतानाच अपूर्वाला ‘आभास हा’ मालिकेतील आर्या नावाच्या मुख्य नायिकेच्या व्यक्तिरेखेसाठी आयरिश निर्मिती संस्थेकडून विचारणा झाली.
-
‘आभास हा’ मालिकेतील व्यक्तिरेखा अपूर्वाच्या वयोगटातल्या मुलीची असल्यामुळे तिने या भूमिकेसाठी होकार दिला.
-
अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यावरही अपूर्वाने इमिटेशन ज्वेलरी डिझाइनिंगचा स्वत:चा ब्रॅण्ड विकसित केला आहे.
-
अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकदा चर्चा रंगताना दिसतात. तिचे खासगी आयुष्य फारच चर्चेत राहिले आहे.
-
अपूर्वा नेमळेकर बिग बॉसमध्ये अनेकदा तिच्या सिंगल असण्याबद्दल बोलली आहे. अनेकदा ती कार्यक्रमातही याबद्दल खुलासा करत असते.
-
अपूर्वा नेमळेकरचा प्रेमविवाह झाला होता. काही महिन्यांनी मात्र त्यांचा घटस्फोट झाला.
-
अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे नाव रोहन देशपांडे असे होते.
-
त्यांचा विवाह २०१४ मध्ये पार पडला होता. ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते.
-
अपूर्वा नेमळेकर आणि रोहन देशपांडे हे ८ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.
-
८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते लग्नबंधनात अडकले होते.
-
मुंबईत पारंपारिक पद्धतीने त्या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.
-
पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
-
लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला.
-
तिच्या रिलेशनशिपबद्दल अनेकदा चर्चा सुरु असते. पण तिने त्याकडे कधीही लक्ष दिलं नाही.
-
खासगी आयुष्यातील वादानंतर आता ती तिने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले.
-
त्याबरोबर ‘ती एका पेक्षा एक जोडीचा मामला’ यामध्येही झळकली होती.
-
तिची ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेच्या दोन्हीही भागात तिने काम केले.
-
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील ‘शेवंता’च्या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
-
तिने ‘आराधना’ या मालिकेतही काम केले होते.
-
त्याबरोबर ‘तू माझा सांगती’ या मालिकेतही तिने उत्तम काम केले आहे.
-
या बरोबरच अपूर्वा ही ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत राणी चेंनम्मा यांच्या भूमिकेत झळकली होती. ही तिची पहिलीच ऐतिहासिक भूमिका होती.
-
‘झी मराठी’वरील ‘एका पेक्षा एक, जोडीचा मामला’, ‘कलर्स मराठी’वरील ‘तू माझा सांगाती’, ‘झी मराठी’वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकांमध्येही अपूर्वाने काम केलं आहे.
-
अपूर्वाने ‘भाखरवाडी ७ किमी’, ‘इश्कवाला लव्ह’सारख्या चित्रपटांमधून काम केले आहे. (फोटो सौजन्य- अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन