-
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आज ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
सलमान खान त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसवर वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करणार आहे.
-
सलमानसाठी त्याचं कुटुंब खूप खास आहे आणि तो नेहमीप्रमाणेच यंदाही कुटुंबासह वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणार आहे.
-
पण याचबरोबर सलमान खानची आणखी एक गोष्ट खूप खास आहे ती म्हणजे त्याच्या हातात असलेलं ब्रेसलेट.
-
चित्रपट असो किंवा आणखी काही सलमान त्याचं हे ब्रेसलेट कधीच हातातून काढत नाही.
-
काही वर्षांपूर्वी सलमान त्याच्या मित्रांसोबत पनवेल फार्महाऊसवर पार्टी करत होता.
-
त्यावेळी मस्ती- धम्माल करता करता ते ब्रेसलेट कुठेतरी हरवलं आणि सलमानचा मूड खराब झाला.
-
त्यानंतर त्यानं मित्रांसोबत ते ब्रेसलेट शोधायला सुरुवात केली. त्यानंतर अश्मित पटेलला ते स्विमिंग पूलमध्ये पडलेलं सापडलं.
-
अखेर ब्रेसलेट सापडल्यानंतर सलमानच्या चेहऱ्यावर हसू आलं.
-
त्याने एका मुलाखतीत हे ब्रेसलेट त्याच्यासाठी का एवढं खास आहे हे सांगितलं होतं.
-
तो म्हणाला होता, ‘माझे बाबा पूर्वी अशाप्रकारचं ब्रेसलेट वापरत असत. त्यावेळी मी त्यांच्या ब्रेसलेटसोबत खेळत असे.”
-
“जेव्हा मी मोठा झालो, काम करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना तसंच एक ब्रेसलेट मला दिलं. यामध्ये असलेल्या खड्याला फिरोजा असं म्हटलं जातं.” असं तो म्हणाला.
-
सलमानच्या ब्रेसलेटमधील निळ्या रंगाचा खडा हा एक विशिष्ट प्रकारचा दुर्मिळ दगड आहे.
-
“आपल्याकडे येणारी नकारात्मक उर्जा हा दगड स्वतःकडे खेचून घेतो. त्यामुळे त्यावर वाकड्या रेषा तयार होतात आणि मग त्याला तडा जातो. सध्या माझ्या हातात असलेला हा सातवा खडा आहे.” असं सलमानने मुलाखतीत सांगितलं होतं.
-
(फोटो सौजन्य- सलमान खान इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल