-
वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली आणि संपूर्ण मनोरंजनसृष्टी हादरली.
-
एक्स बॉयफ्रेंड शिझान खानमुळे तुनिषाने हे पाऊल उचलल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे.
-
सध्या शिझान पोलिस कोठडीत आहे आणि पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
-
आजपासून तब्बल ८ दिवसांनी तुनिषाचा वाढदिवस आहे.
-
आज तुनिषा आपल्यात असती तर तिने गेल्यावर्षीप्रमाणेच तिचा हा २० वा वाढदिवस थाटात साजरा केला असता.
-
४ जानेवारीला तुनिषाचा वाढदिवस आहे.
-
सोशल मीडियावर सध्या गेल्यावर्षी तिने साजरा केलेल्या १९ व्या वाढदिवसाचे फोटोज व्हायरल होत आहेत.
-
या फोटोमध्ये तुनिषा खूप आनंदी दिसत आहे. दरवर्षी तुनिषा तिचा वाढदिवस असाच थाटात साजरा करायची.
-
तुनिषाचे फोटो पाहून सगळेच भावूक झाले आहेत.
-
तुनिशा तिच्या आईसोबत मुंबईत राहत होती आणि ती तिच्या खूप जवळ होती. तुनिशा तिच्या आईला लाडाने बेबे अशी हाक मारायची. तुनिषाने तिच्या आईबरोबरचे अनेक फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
तुनिषाने कतरिना कैफच्या ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ तसेच विद्या बालनच्या ‘कहानी २’मध्ये काम केलं आहे.
-
तुनिषाचे वडील लवकर गेल्याने तिच्यावर जवाबदारी पडली. वडिलांबरोबर लहानपणी वाढदिवस साजरा करतानाचा फोटोसुद्धा तिने शेअर केला होता. (फोटो सौजन्य : तुनिषा शर्मा / फेसबुक पेज)
लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल