-
राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
-
या चित्रपटात मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेच्या भूमिकेत आहे.
-
तर राष्ट्रपिता महात्मा गांधीची भूमिका दिग्गज अभिनेते दीपक अंतानी साकारताना दिसणार आहे.
-
दीपक अंतानी हे एक नावाजलेले दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक गुजराती चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
-
‘भाव भाव ना भरदार’, ‘कुंकू पुरायु ना अंबा ना चौक मा’, ‘प्रितम अपनी पहली प्रीत’ यांसारखे गुजराती चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत.
-
दिग्दर्शनाबरोबरच ते एक उत्तम अभिनेते आहेत. याआधीही त्यांनी गुजराथी नाटकांत महात्मा गांधींची भूमिका साकारली होती.
-
महात्मा गांधींची भूमिका साकारण्यासाठी ते विशेष ओळखले जातात.
-
महात्मा गांधी यांच्या भूमिकेत सर्वाधिक प्रयोग केल्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. २०१९च्या ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये याची नोंद आहे.
-
‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड २०२०’मध्येही त्याच्या नावे नोंद आहे.
-
मराठीतील दिग्गज अभिनेत्री रोहिणी हट्टांगडी यांच्याबरोबरही त्यांनी काम केलं आहे.
-
चिन्मय मांडलेकर व दीपक अंतानी मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो: दीपक अंतानी/ इन्स्टाग्राम)

Maharashtra Budget 2025 LIVE Updates: ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे १५०० वरून वाढणार कधी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…