-
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाचा आज वाढदिवस आहे.
-
ट्विंकल ही सिनेसृष्टीत सक्रिय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
-
ट्विंकलला अभिनयात फारसं यश मिळालं नसलं तरी लिखाणात तिने नाव कामावलं आहे. एखादा पुस्तक तसेच एखाद्या मॅगजीनमध्ये सदर लिहिणं यामधून तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
-
ट्विंकल ही तिच्या लिखाणातून कायमच ठामपण तिचे विचार मांडत असते.
-
ट्विंकल गेल्या २० वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. तिने १९९५ साली ‘बरसात’ चित्रपटात बॉबी देओलबरोबर अभिनय करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
-
त्यानंतर तिने ‘मेला’ आणि ‘इतिहास’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. २००१नंतर तिने चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं.
-
ट्विंकल आणि तिचा पती अभिनेता अक्षय कुमार यांना मुलगी नितारा आणि मुलगा आरव ही दोन अपत्ये आहेत.
-
काही वर्षांपूर्वी मिड- डे या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ट्विंकलने तिने चित्रपटात दिलेल्या बोल्ड सीनबद्दल मुलांना काय वाटते? याबद्दल सांगितले होते.
-
“मी माझ्या मुलांना माझे चित्रपट पाहू देत नाही. माझा मुलगा आरव अनेकदा माझ्या चित्रपटांची खिल्ली उडवतो.”
-
“‘जान’ चित्रपटामध्ये एक सीन आहे. जिथे मी अजय देवगणच्या छातीचे चुंबन घेत आहे. एकदा माझा मुलगा तोच सीन पुन्हा पुन्हा पाहत होता.”
-
“एकदा तर माझ्या मुलाने माझ्या वाढदिवसासाठी या व्हिडीओचा कोलाज बनवला. तो खरंच मूर्ख आहे.”
-
“मला वाटत नाही की माझ्या या ‘उत्कृष्ट’ फिल्मी करिअरला माझ्या कुटुंबाचं फारसं समर्थन आहे.”
-
“नोकरी आणि करिअर यात फरक आहे. मला अभिनय करणं फारसं आवडायचं नाही.”
-
राज कंवर दिग्दर्शित ‘जान’ चित्रपट १९९६ मध्ये रिलीज झाला. यात अजय देवगण मुख्य भूमिकेत होता.
-
ट्विंकलचा शेवटचा चित्रपट २००१ साली आलेला ‘लव्ह के लिए कुछ भी करेगा’ होता. त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम केलं नाही.

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?