-
अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
-
या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून नवा वाद रंगला आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घाललेल्या भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. त्यामुळे हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे.
-
भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भाजपा आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. याविरोधात काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आलं आहे.
-
यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता सेन्सॉर बोर्डाने या गाण्यात आणि चित्रपटात काही बदल सुचवले आहेत.
-
‘पठाण’ चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. या चित्रपटातील गाणं आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी चित्रपट निर्मात्यांना दिली आहे.
-
हा संबंधित बदल करुन सेन्सॉर बोर्ड समोर हा चित्रपट सादर करावा, असं प्रसून जोशी यांनी सांगितलं आहे.
-
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी माहिती देताना म्हटलंय, “हा चित्रपट नुकताच सीबीएफसी समितीकडे प्रमाणपत्रासाठी दाखवण्यात आला. यावेळी सेन्सॉर बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याचे परीक्षण करण्यात आले.”
-
“यावेळी परीक्षक समितीने निर्मात्यांना गाण्यांसह चित्रपटात काही बदल करण्याचे सुचवले आहे. हे सुचवलेले बदल अंमलात कसे आणावे, यासाठी मार्गदर्शनही केले आहे.”
-
“हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्याची सुधारित आवृत्ती सेन्सॉरकडे सादर करावी”, असे आदेशही सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत.
-
“सेन्सॉर बोर्ड हे नेहमीच सर्जनशील अभिव्यक्ती आणि प्रेक्षकांची संवेदनशीलता यांच्यातील योग्य संतुलन शोधण्यासाठी वचनबद्ध असते. त्यामुळे आपली संस्कृती आणि श्रद्धा यांचा विचार प्रत्येकानं करावा आणि त्याबाबत सावधगिरी बाळगावी.”
-
“निर्माते आणि प्रेक्षक यांच्यातील विश्वास महत्वाचा आहे. निर्मात्यांनी त्या दिशेने कार्य करत राहिले पाहिजे”, असेही प्रसून जोशी यांनी म्हटले.
-
दरम्यान शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Champions Trophy: यजमान पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष फायनलनंतर स्टेजवर का उपस्थित नव्हते? वसीम अक्रमने सांगितलं कारण