-
मिका सिंग बॉलिवूडचा आघाडीचा गायक आहे. अनंत अंबानीच्या साखरपुड्यात त्याने आपली कला सादर केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने हा कार्यक्रमात १० मिनिटांचं सादरीकरण केलं. पण या १० मिनिटाच्या सादरीकरणासाठी त्याने १.५ कोटी रुपये आकरले आहेत.
-
इंडियन आयडॉल कार्यक्रमामुळे चर्चेत आलेली गायिका नेहा कक्कर एका गाण्यासाठी १५ ते १८ लाख रुपये मानधन म्हणून घेते.
-
तरुणांच्या गळ्यातला ताईत अशी ओळख असणाऱ्या अरिजित सिंहदेखील एका गाण्याचे १८ ते २० लाख रुपये मानधन म्हणून घेतो. बॉलिवुडमधील सर्वात महागडा गायक म्हणून त्याच्याकडे बघितले जाते.
-
‘यो यो हनी सिंग’ अशी ओळख असणारा हनी सिंग परदेशातदेखील प्रसिद्ध आहे. एका गाण्याचे तो २२ लाख रुपये घेतो.
-
संगीतकार गायक विशाल दादलानी एका गाण्याचे १० ते १५ लाख रुपये घेतो.
-
बॉलिवूडची गोड गळ्याची गायिका श्रेया घोषालदेखील एका गाण्याचे २५ लाख रूपये घेते.
-
‘रॉकस्टार’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला मोहित चौहान हा गायक एका गाण्यासाठी १५ ते १७ लाख रुपये घेतो.
-
९० च्या दशकापासून एक आवाज सर्वांच्या लक्षात आहे तो म्हणजे सोनू निगम, सोनू एका गाण्याचे १२ ते १५ लाख रुपये घेतो.
-
भारतीय रॅपर अशी ओळख असणारा बादशाहदेखील एका गाण्यासाठीं १८ ते २० लाख रुपये मानधन म्हणून घेतो. फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर