-
२०२२ मध्ये बॉलिवूडच्या चित्रपटांनी फारशी कमाई केली नाही, बिग बजेट चित्रपट फारसे चालले नाहीत. मात्र आता २०२३ वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बड्या स्टार्सचे चित्रपट येणार आहेत.
-
१३ जानेवारीला विशाल भारद्वाज यांच्या मुलाने दिग्दर्शित केलेला ‘कुत्त्ते ‘हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तब्बू, कुमुद मिश्रा, कोंकणा सेनशर्मा, नसीरुद्दीन शाह, राधिका मदन आणि अर्जुन कपूर असणार आहेत. हा चित्रपट ऍक्शन थ्रिलर असणार आहे.
-
अंशुमन झा आणि मिलिंद सोमण यांचा ‘लक्कड़बग्गा’ हा चित्रपट कुत्तेच्या बरोबरीने प्रदर्शित होणार आहे.
-
कोलकातामधील एका सत्यघटनेवर हा चित्रपट बेतला आहे. २८ व्या कोलकाता चित्रपट महोत्सवात हे प्रदर्शित करण्यात आले.
-
‘शेरशहा’नंतर सिद्धार्थ मल्होत्रा आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मिशन मजनू’ चित्रपटात तो रश्मिका मंदनाबरोबर झळकणार आहे.
-
२० जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतीय गुप्तेहेरावर बेतला आहे.
-
शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारी प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान ३ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
-
या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम दिसणार आहे.
-
या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याने बराच वाद निर्माण झाला होता. आता सेन्सॉर बोर्डाने बदल करण्याचे आदेश दिले आहेत.फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”