-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
-
या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर कायमच चर्चेत असतात.
-
सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधणं मधुराणी यांना आवडतं.
-
नुकतंच त्यांनी नववर्षानिमित्त व्हिडीओ शेअर करत एक खुलासा केला आहे.
-
मधुराणी यांच्या गालावर गेल्या काही दिवसांपासून एक खूण दिसत आहे. मात्र ही खूण गालावरची खळी नसून जखम असल्याचं मधुराणी यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं.
-
त्या म्हणाल्या, “दीड वर्षांपूर्वी माझ्या गालावर एक उंचवटा दिसायला लागला आणि नंतर मला या जखमेबद्दल कळलं. माझं ऑपरेशन झालं. जून, जुलैच्या दरम्यान मी काही एपिसोड बॅन्डेज लावून केले.”
-
“मला या जखमेचे आभार मानायचे आहेत कारण या जखमेने मला खूप शिकवलं. मी जेव्हा बॅन्डेज लावून शूट करत होते तेव्हा मालिकेचा क्लायमॅक्स होता.”
-
“तरीही प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं, मला या जखमेसहीत स्वीकारलं. तेव्हा या जखमेनंही मला स्वतःला जसं आहोत तसं स्वीकारायला शिकवलं.”
-
“ऑपरेशननंतर ती जखम भरून निघायला खूप वेळ लागला. या काळात माझ्या मेकअप आर्टिस्टनी माझी खूप काळजी घेतली. ती हळूहळू बरी झाली आणि तिच्या जागी छान खळी तयार झाली.”
-
“पण पुन्हा एकदा वर्षभरातून आतून एक उंचवटा जाणावायला लागला आणि बाहेरच्या बाजूने काही डिस्चार्ज बाहेर यायला लागला.”
-
“तेव्हा मात्र माझी अवस्था खूप वाईट झाली. पुन्हा एकदा सर्जरी करावी लागली. यावेळी लेझर सर्जरी झाली. मला माहीत आहे की मेकअपशिवाय मी खूप विचित्र दिसते. मला त्यावेळी मेकअपशिवाय कॅमेऱ्यासमोर यायला भीतीही वाटायची.”
-
“पण जेव्हा मी माझ्या मेंटॉरशी बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, जोपर्यंत तू आतून मनातून ठीक होत नाहीस तोपर्यंत ही बाहेरची जखमही ठीक होणार नाही. आतून ठीक झालीस तर ही जखम आपोआप ठीक होईल.” (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स