-
रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने खरोखरच प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
-
३० डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं या त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे.
-
त्यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे.तीन दिवसातच या चित्रपटाने १० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे.
-
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी २.२५ कोटींची कमाई केली होती
-
तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने ३.५ कोटींचा गल्ला जमवला.
-
काल म्हणजेच १ जानेवारी रोजी या चित्रपटाने ४.५ कोटींची कमाई करत आतापर्यंत एकूण कमाईचा १० कोटींचा आकडा पार केला आहे.
-
या चित्रपटाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
-
या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. प्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.

अरे देवा! MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची लग्नपत्रिका व्हायरल; लिहलं असं काही की…पाहून पोट धरुन हसाल