-
बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. हा शो सलमान खान होस्ट करत आहे. सध्या टीव्हीवर बिग बॉसचा १६वा सीझन सुरू आहे.
-
बिग बॉस १६च्या अनेक स्पर्धकांच्या मालमत्तेची माहिती विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये आहे. आज आपण बिग बॉस १६ च्या काही लोकप्रिय स्पर्धकांची मालमत्ता आणि त्यांचे प्रत्येक आठवड्याचे मानधन जाणून घेऊया.
-
बिग बॉस १६ ची प्रसिद्ध स्पर्धक अर्चना गौतम हिने काँग्रेसच्या तिकिटावर यूपी विधानसभा निवडणूकदेखील लढवली आहे. २०२२ च्या निवडणुकीदरम्यान अर्चनाने सांगितले होते की तिच्याकडे सुमारे ३२ लाख रुपयांची संपत्ती आहे.
-
बिग बॉस १६ ची लेडी डॉन अर्चना गौतम शोमध्ये दर आठवड्याला ३ लाख कमावत असल्याची माहिती आहे.
-
प्रियांका चहर चौधरी बिग बॉस १६ मध्ये चांगली खेळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चहर चौधरीची संपत्ती २० ते २५ कोटी रुपयांपर्यंत आहे.
-
‘उडारियां’ मालिकेतील अभिनेत्री प्रियंका चहर चौधरीला तिचे चाहते वाघिण म्हणतात. ती आठवड्याला ५ लाख कमवत आहे.
-
अभिनेता अंकित गुप्ताला बिग बॉस १६ मधून बाहेर काढण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंकितकडे जवळपास ४५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
-
अंकित गुप्ता हा शोचा सायलेंट हिरो म्हणून ओळखला जात होता आणि तो शोमध्ये दर आठवड्याला ६-७ लाख रुपये घ्यायचा.
-
चित्रपट निर्माता साजिद खानदेखील बिग बॉस १६चा भाग आहे. त्यांची एकूण संपत्ती ६५ कोटी रुपये आहे.
-
साजिद खानने अखेर शोमध्ये आपला खेळ दाखवण्यास सुरुवात केली आहे. या शोमधून ते दर आठवड्याला सुमारे ५ लाख कमावतात.
-
बिग बॉस १६ मध्ये सलमानकडून अनेकदा ओरडा खाणारा अभिनेता शालीन भानोत याची एकूण संपत्ती १६ कोटींच्या आसपास असल्याची माहिती समोर आली आहे.
-
घरातील मिस्टर प्रोटीन शालीन भानोट रोज चिकनसाठी भांडतो. त्याला दर आठवड्याला ४ ते ५ लाख मिळतात.
-
वकील आणि सुंदर अभिनेत्री निम्रित कौर अहलुवालिया तिच्या उदात्त वृत्तीने मनावर राज्य करत आहे, चाहत्यांना शोमधील निम्रित-अब्दू क्षण आवडतात.
-
ही अभिनेत्री दर आठवड्याला ८ लाख रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे.
-
दंतचिकित्सक आणि अभिनेत्री सौंदर्या शर्मा तिच्या खेळाने चाहत्यांना प्रभावित करत आहे. बिग बॉसमध्ये ती दर आठवड्याला ३-४ लाख कमावते आहे.
-
बिग बॉस १६मधील टीना दत्ताचे घरामध्ये तिच्या विलक्षण स्वभावाने सर्वांचे मनोरंजन करत आहे. ती दर आठवड्याला सुमारे ८-९ लाख इतकी मोठी कमाई करत आहे.
-
बिग बॉस १६ मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धक म्हणून अब्दूचे नाव अग्रस्थानी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ताजिकिस्तानकहा सर्वात तरुण गायक घरात राहण्यासाठी दर आठवड्याला ३-४ लाख रुपये आकारत आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीव्ही अभिनेत्री सुंबुल तौकीरची एकूण संपत्ती जवळपास ९ कोटी आहे.
-
सुंबुल फक्त १९ वर्षांची आहे. रिपोर्ट्सनुसार, सुंबुल ही शोची सर्वात महागडी स्पर्धक आहे. ती दर आठवड्याला १२ लाख रुपये घेते.
-
‘बस्ती का हस्ती’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या रॅपर एमसी स्टॅनने घरातील आपला खेळ आणखीनच रंजक केला आहे. स्टॅन दर आठवड्याला ७ लाख रुपये आकारत आहे.
-
बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे या सीझनमधील सर्वात मजबूत स्पर्धकांपैकी एक आहे. शिव दर आठवड्याला ५ लाखांची कमाई करतो. (Photos: Instagram)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश