-
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला अडीच वर्षे झाली आहेत. ज्या घरात त्याने आत्महत्या केली, त्या घराला कोणीही भाडेकरू मिळत नसल्याची बातमी आली होती.
-
अशातच आता लवकरच या घराला भाडेकरू मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
-
सुशांत ज्या घरात राहायचा, ते घर आतून कसं दिसतं, त्यावर एक नजर टाकुयात.
-
सुशांत सिंग राजपूत मुंबईतील वांद्रे भागात सी-फेसिंग फ्लॅटमध्ये राहत होता.
-
या डुप्लेक्स फ्लॅटमध्ये चार बेडरूम आहेत.
-
माँट ब्लँक सोसायटीच्या या फ्लॅटचे भाडे दरमहा ५ लाख रुपये आहे.
-
या फ्लॅटसाठी सुशांत दरमहा साडेचार लाख रुपये भाडं देत होता. पण सुशांतच्या मृत्यूनंतर त्याला भाडेकरू मिळत नव्हता.
-
या घराचा मालक परदेशात राहतो. सुशांतचे निधन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर घरमालकाने आपला फ्लॅट चित्रपटसृष्टीतील व्यक्तीला भाड्याने न देण्याचा निर्णय घेतला आहे.
-
घर कोणी भाड्याने घेतलंय, त्याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. (फोटो – स्क्रीनशॉट्स)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?