-
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आज तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून दीपिका ही तिच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे आणि त्यावरुन रंगलेल्या वादामुळे सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे.
-
दीपिका तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते.
-
रणवीर सिंगला डेट करण्याआधी दीपिका पदुकोणचं रणबीर कपूरशी अफेअर होतं आणि त्यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा झाली होती.
-
दीपिकाने काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत रिलेशनशिप आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या फसवणूकीबद्दल खुलासा केला होता.
-
दीपिकाने त्या मुलाखतीत तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिची कशाप्रकारे फसवणूक केली, याबद्दल सांगितले होते. “मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडले होते.” असे तिने म्हटले होते.
-
“माझ्यासाठी सेक्स म्हणजे फक्त शारीरिक संबंध नाही. तर त्यात भावनांचाही समावेश असावा.”
-
“मी रिलेशनशिपमध्ये असताना त्याला कधीही फसवले नाही किंवा भरकटले देखील नाही.”
-
“जर मी एखाद्याला मूर्ख बनणार असेल, तर मी नातेसंबंधात का असेन? त्यापेक्षा अविवाहित राहणे आणि मजा करणे पसंत करेन.”
-
“पण सगळ्यांनाच असं वाटत नाही. कदाचित म्हणूनच मी भूतकाळात दुखावले गेले.”
-
“पहिल्यांदा जेव्हा त्याने माझी फसवणूक केली, तेव्हा मला वाटले की या नात्यात किंवा माझ्यात काहीतरी चूक आहे.”
-
“पण जेव्हा एखाद्याला याची सवय होते तेव्हा तुम्हाला कळते की समस्या त्याच्याबाबत आहे.”
-
“मी माझ्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडले होते आणि तरीही मी त्याला दुसरी संधी दिली. हा माझा मूर्खपणा होता.”
-
“मीच मूर्ख होते की मी त्याला दुसरी संधी दिली. कारण तो माझ्याकडे भीक मागत होता.”
-
“माझ्या आजूबाजूचे लोक मला सांगत होते की तो अजूनही भटकतोय.”
-
“तेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवायचे. पण त्यानंतर मी त्याला रंगेहाथ पकडले. त्यातून बाहेर पडायला मला वेळ लागला.”
-
“मला त्याने केलेली ही फसवणूक अजिबात सहन झाली नाही. त्यामुळे मी ते नातं तोडलं.” असे दीपिकाने सांगितले.
-
रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर तिने काही काळ विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या यालाही डेट केले. पण दीपिकाने सिद्धार्थसोबतच्या नात्याबद्दल कधीही काहीही सांगितले नाही.
Champions Trophy: यजमान पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष फायनलनंतर स्टेजवर का उपस्थित नव्हते? वसीम अक्रमने सांगितलं कारण