-
आता फक्त अल्लू अर्जुनच नाही तर त्याची मुलगी अरहाही साऊथच्या चित्रपटांमध्ये कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
अरहा वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी चित्रपटात पदार्पण करणार आहे. अरहाला तिच्या वडिलांकडून अभिनयाचे कौशल्य मिळाले आहे. यामुळे अल्लू अर्जुन खूपच खुश आहे.
-
अरहा लहान वयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे, हे पाहून तिचे भविष्य उज्वल असणार आहे, असे म्हटले जात आहे.
-
अरहा ‘शकुंतलम’ चित्रपटात सामंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे. पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
लोकप्रिय स्टार किड्समध्ये अरहाचा समावेश होतो. चाहत्यांना तिचा गोंडसपणा खूपच आवडतो. अल्लू अर्जुन त्याच्या मुलीच्या खूप जवळ आहे. तो अनेकदा मुलीसोबत मस्ती करतानाचे फोटो शेअर करत असतो.
-
अल्लू अर्जुनने एका मुलाखतीत सांगितले होते की अरहा तिचे शिक्षण पूर्ण करून मोठी होईल आणि त्यानंतर अभिनयाच्या जगात प्रवेश करेल.
-
परंतु आता एवढ्या लहान वयात अरहाने मिळवलेल्या यशाने अल्लू अर्जुनला आकाश ठेंगणे झाले आहे.
-
जेव्हा मीडियाने अल्लू अर्जुनशी मुलीच्या पदार्पणाबद्दल विचारणा केली तेव्हा तो म्हणाला की “मला स्वतःला माहित नाही की मला अरहाला ऑनस्क्रीन पाहून कसे वाटेल”.
-
अतिशय गोंडस दिसणारी अरहा अल्लू अर्जुनच्या कुटुंबातील चौथी पिढी आहे जी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणार आहे.
-
अरहाचा जन्म २१ नोव्हेंबर २०१६ रोजी झाला. तिला अल्लू अयान नावाचा मोठा भाऊ आहे. अरहाच्या नावाचा अर्थ भगवान शिव आहे.
-
सर्व फोटो: Allu Arjun/Instagram

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…