-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक असणाऱ्या आरोह वेलणकरचा प्रवास संपला आहे. प्रसाद जवादे पाठोपाठ आरोहने वेलणकरनेही बुधवारी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली.
-
‘बिग बॉ’सच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आरोहने ‘ईटाम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले आहेत.
-
आरोहने यंदाच्या पर्वातील नॉमिनेशनवर प्रश्नचिन्ह उभं करत ‘बिग बॉस मराठी’वर गंभीर आरोप केले आहेत.
-
तो म्हणाला, “बिग बॉसच्या चौथ्या पर्वात अनेक ट्वीस्ट होते. प्रसाद जवादे व अमृता देशमुख चांगले स्पर्धक होते”.
-
“त्यांच्या घरातून बाहेर जाण्याने मलाही धक्का बसला होता. मी त्यांना टॉप ५ फायनलिस्टमध्ये बघत होतो”.
-
“घरातील सदस्यांपैकी मी एक उत्कृष्ट स्पर्धक होतो. मी खेळातून बाहेर पडेन, असं मला कधीच वाटलं नव्हतं”, असं आरोह म्हणाला.
-
पुढे तो म्हणाला, “पात्रता नसलेले सदस्य अजूनही घरात व टॉप ५ मध्ये आहेत. मला यावर आता जास्त बोलायचं नाही”.
-
“मी घरातून बाहेर पडलो आहे. पण मी माझा खेळ उत्तमरित्या खेळलो”, असंही पुढे आरोह म्हणला.
-
“वाईट व नकारात्मक वृत्तीचे स्पर्धक घरात आहेत आणि सकारात्मक स्पर्धकांना बाहरे काढलं गेलं आहे”, असं म्हणत आरोहने ‘बिग बॉस मराठी’च्या टीमबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
-
आरोह वेलणकरने एक्झिट घेतल्यानंतर आता अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, किरण माने, अक्षय केळकर व अमृता धोंगडे यंदाच्या पर्वाचे टॉप ५ फायनलिस्ट ठरले आहेत.
-
रविवारी, ८ जानेवारीला होणाऱ्या अंतिम सोहळ्यात ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता घोषित केला जाणार आहे. (सर्व फोटो: कलर्स मराठी)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”