-
शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.
-
बॉलिवूडमध्ये शाहरुखने सुरुवातीला नकारात्मक भूमिका जरी केल्या तरी त्याच्या रोमॅंटिक भूमिकांमुळेच त्याला जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली.
-
प्रेमाच्या बाबतीत आजही कित्येक तरुण तरुणी शाहरुखला फॉलो करतात.
-
संपूर्ण जगाला प्रेमाचे धडे देणारा रोमान्सचा बादशाह किंग खानच्या आई-वडिलांची प्रेमकहाणीसुद्धा तितकीच रोमांचक आहे.
-
शाहरुखचे वडील मीर ताज मोहम्मद आणि आई लतीफ फातीमा यांनी १९५९ मध्ये लग्न केलं. या दोघांचीही प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटातील प्रेम कहाणीपेक्षा कमी नाही.
-
शाहरुखचे वडील मीर ताज मोहम्मद भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात तरुण क्रांतिकारक होते. एलएलबीचं शिक्षण घेतलेल्या मीर हे फाळणीनंतर दिल्लीमध्ये स्थायिक झाले.
-
त्यांनी सुरुवातीला बरेच व्यवसाय केले, शिवाय त्यांनी चहा विकायचासुद्धा व्यवसाय केला.
-
एके दिवशी इंडिया गेटच्या परिसरात एक अपघात झाला होता, एक चारचाकी उलटली होती आणि आत काही लोकं अडकले होते. मीर यांनी त्यांना वाचवलं आणि रक्तदानसुद्ध केलं. त्यांच्यातील एक व्यक्ती होती शाहरुखची आई लतीफ फातीमा. यानंतर दोन्ही कुटुंबांचे अगदी सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले.
-
नंतर लतीफ फातिमा यांच्या वडिलांनी एकदिवस मीर यांना बोलवून आपल्या मुलीशी लग्न करण्यासंदर्भात विचारणा केली. तेव्हा लतीफ फातीमा यांचा क्रिकेटर अब्बास अलीशी साखरपुडा झाला होता.
-
मीर यांच्या घरून या लग्नाला विरोध होता, पण नंतर तो मावळला आणि मीर ताज मोहम्मद आणि लतीफ फातीमा हे १९५९ मध्ये लग्नबंधनात अडकले.
-
शाहरुखची आई ही खूप पुढारलेल्या विचारांची होती. त्यांनी इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले होते.
-
त्या मजिस्ट्रेट होत्या. याबरोबरच त्या सामाजिक कार्यातही पुढे होत्या. पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि फेसबुक)
९ फेब्रुवारी राशिभविष्य: त्रिपुष्कर योगात मेष, मीन राशींच्या सुखाचा होणार शुभारंभ; कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या आयुष्यात होतील अनपेक्षित बदल