-
अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद संपायचं काही नाव घेत नाही.
-
उर्फी जावेदच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला.
-
उर्फीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे. दरम्यान या संपूर्ण वादाला राजकीय वळण मिळालं आहे.
-
शिवाय उर्फीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना उत्तर देत आहे.
-
उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. अंगभर कपडे घातल्यामुळे मला एलर्जी होते असं उर्फीने या व्हिडीओमध्ये सांगितलं.
-
शिवाय तिच्या अंगावर लाल डाग, पुरळ व एलर्जी झाली असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.
-
उर्फी म्हणाली, “तू अंगभर कपडे परिधान का करत नाहीस? असं मला विचारलं जातं. पण कपड्यांमुळे मला एलर्जी होते. म्हणून मी अंगभर कपडे परिधान करणं टाळते.”
-
उर्फीच्या या उत्तरावर आता चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
त्या म्हणाल्या, “एलर्जी असेल तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत. त्या गोळ्या देऊन आपण एलर्जी दूर करू शकतो.”
-
“काही काळजी करायची गरज नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं ज्या सावित्री बाईंनी आम्हाला सक्षम व सुशिक्षित बनवलं त्याच सावित्रीच्या लेकी आज अशा नागड्या गोष्टीचं समर्थन करतात. हे त्या सावित्री बाईंना तरी अभिप्रेत असेल का?”
-
आता या दोघींमधील वाद आणखीन किती वाढणार? हे पाहावं लागेल. (सर्व फोटो – फेसबुक)
-
(हेही पाहा – Photos : सोनाली कुलकर्णीचा नवरा व लेकीला पाहिलंत का? मॉरिशसमध्ये कुटुंबासह धमाल करताना दिसली अभिनेत्री)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”