-
बहुरंगी अभिनय, सूत्रसंचालन आणि नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा ‘प्राजक्तप्रभा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
-
त्यानंतर आता प्राजक्ताने तिचा स्वत:चा ज्वेलरी ब्रॅण्ड सुरू केला आहे. ६ जानेवारी २०२३ रोजी या ब्रॅण्डचा उद्धाटन सोहळा पार पडला.
-
या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
-
नुकतंच प्राजक्ताने या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
“प्राजक्तराज” पारंपरिक मराठी साज…च्या उद्घाटनासाठी दस्तूरखुद्द “मा. श्री. राजसाहेब ठाकरे” व महाकादंबरीकार “विश्वास पाटील” यांची उपस्थिती लाभावी.”
-
“हा अत्यंत दूर्मिळ असा योग. त्यासाठी मी स्वतःला व आमच्या “प्राजक्तराज” उपक्रमाला भाग्यवान समजते.”
-
“सौ. शर्मिला ताईंच्या येण्यानं आमच्या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली.”
-
“या प्रतिभावंत, थोर माणसांच्या येण्यानं आमचा छोटेखानी उपक्रम भव्य होऊन सर्वदूर पसरला. त्यासाठी मी या तिघांची आजन्म ऋणी राहीन.”
-
“परवा संध्याकाळपासून सबंध महाराष्ट्राने “प्राजक्तराज”ला फोन, मेसेजेस्, इ-मेल्स, वेबसाईट व्हिजिट, ऑनलाईन ऑर्डरद्वारे दिलेला प्रतिसाद धबधब्यासारखा प्रचंड आहे, भारावून टाकणारा आहे.”
-
“त्यासाठी मनात अत्यंत कृतज्ञता. तुमच्या प्रेमाला तितक्याच प्रेमानं साद देण्यासाठी आम्ही उत्सूक आहोत”, असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.
१४ फेब्रुवारी पंचांग: सुकर्मा योगात १२ राशींचा कसा जाणार दिवस? कोणाला राहावे लागेल मतांवर ठाम, तर कोण होईल धनवान; वाचा तुमचे राशिभविष्य