-
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस मराठीच्या’ चौथ्या पर्वाने अखेर निरोप घेतला.
-
अक्षय केळकर हा यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला.
-
तर अपूर्वा नेमळेकरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
-
अक्षय केळकर हा खेळाडू वृत्ती, टास्क मधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला.
-
बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी त्याला मिळाली आणि आता तो या पर्वाचा विजेता ठरला.
-
अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता होताच मालामाल झाला आहे.
-
अक्षय केळकरचे वडील रिक्षा चालवतात. त्यामुळे रिक्षा चालकाचा मुलगा बिग बॉस विजेता झाल्याचे बोललं जात आहे.
-
अक्षय केळकरला बिग बॉसची ट्रॉफी देण्यात आली.
-
त्याबरोबरच त्याला १५ लाख ५५ हजार इतकी रक्कम मिळाली.
-
इतकेच नाही तर पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचरही देण्यात आले.
-
तसेच फिनोलेक्स पाइप बेस्ट कॅप्टन ॲाफ सीझनसाठी त्याची वर्णी लागली. यासाठी त्याला ५ लाख रुपये मिळाले आहेत.
-
अभिनेता अक्षय केळकरने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या विजेतपदाचा मान पटकावल्यानंतर आता सर्वत्र त्याचे कौतुक सुरु आहे.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच