-
हिंदीसह इतरही काही भाषांमध्ये प्रसारित होणारा आणि अत्यंत लोकप्रिय अशा ‘बिग बॉस मराठीच्या’ चौथ्या पर्वाने अखेर निरोप घेतला.
-
अक्षय केळकर हा यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला.
-
अक्षयची खिलाडू वृत्ती, टास्क मधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो कायम चर्चेत असायचा.
-
बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी त्याला मिळाली आणि आता तो या पर्वाचा विजेता ठरला.
-
अक्षय केळकरचे वडील रिक्षा चालवतात. त्यामुळे रिक्षा चालकाचा मुलगा बिग बॉस विजेता झाल्याची सध्या चांगलीच चर्चा आहे.
-
बिग बॉसच्या ट्रॉफीसह त्याला १५ लाख ५५ हजार इतकी रक्कमही मिळाली.
-
या शोमध्ये विजेतेपदाचा मान पटकावल्यानंतर आता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
बिग बॉसमध्ये येण्याआधी त्याने अभिनयातही त्याची चुणूक दाखवली आहे.
-
अपूर्वा नेमळेकर ही विजेतेपदाची दावेदार मानली जात असताना अक्षयने ही ट्रॉफी जिंकून चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे.
-
अक्षयचा खेळ लोकांना एवढा आवडायचा की त्याला ‘अँग्री यंग मॅन’ म्हंटलं जाऊ लागलं.
-
अक्षयच्या चाहत्यांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.
-
लवकरच अक्षयला ‘बिग बॉस १७’ या हिंदी कार्यक्रमात पाहायला मिळावं अशी इच्छा त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. (फोटो सौजन्य : अक्षय केळकर / इन्स्टाग्राम)
Video : जीव महत्त्वाचा की अहंकार? अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी बसने केले कारला ओव्हरटेक, पण पुढे जे घडले…; पुण्यातील एसबी रोडवरील व्हिडीओ व्हायरल