-
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे.
-
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट कोटींची कमाई करत आहे.
-
चित्रपट प्रदर्शित होऊन दहा दिवस झाल्यानंतरही बॉक्स ऑफिसवर ‘वेड’चा बोलबाला कायम आहे.
-
‘वेड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती.
-
त्यानंतर पहिल्या आठवड्यात २०.६७ कोटींचा गल्ला जमवला.
-
प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशीही वेडची यशस्वी घौडदोड सुरुच आहे.
-
या चित्रपटाने दहाव्या दिवशी रविवारी तब्बल ५.७० कोटींची कमाई केली आहे.
-
रेकॉर्डब्रेक कमाई करत ‘वेड’ने सैराट चित्रपटालाही मागे टाकलं आहे.
-
एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणार हा मराठीतील पहिलाच चित्रपट ठरला आहे.
-
रितेश-जिनिलीयाचा ‘वेड’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करत आहेत.
-
(सर्व फोटो: इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख