-
‘रंग माझा वेगळा’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत दीपा आणि कार्तिक पुन्हा एकदा सर्वांच्या साक्षीने विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
गैरसमज दूर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने दोघांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत आहे.
-
मेहेंदी आणि हळदी समारंभ थाटात पार पडल्यानंतर आता दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
-
दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्यात इनामदार कुटुंबाच्या खास परफॉर्मन्स सोबतच ‘स्टार प्रवाह परिवारा’तील सदस्यही उपस्थित असणार आहेत.
-
‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पू-शशांक आणि ‘लग्नाची बेडी’ मालिकेतील सिंधू-राघवच्या खास परफॉर्मन्सने संगीत सोहळ्याला चार चांद लागणार आहेत.
-
तर ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील मल्हार आणि स्वराजचं खास गाणंही सादर केलं जाणार आहे.
-
दीपिका व कार्तिकीचा खास डान्स.
-
दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्यासाठी काळ्या रंगाला विशेष पसंती देण्यात येणार आहे.
-
‘ब्लॅक इज ब्युटिफूल’ म्हणत खुद्द सौंदर्या इनामदारनेच दीपा-कार्तिकचा वेडिंग लूक डिझाईन केला आहे.
-
दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्यातील खास क्षण.
-
त्यामुळे त्यांचा संगीत सोहळ्यातील लूक लक्षवेधी असणार आहे. (सर्व फोटो: स्टार प्रवाह)
Khokya Bhosale Arrested : सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात