-
रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने खरोखरच प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
-
३० डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. तर या चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेलं आहे.
-
नुकताच या चित्रपटाने ‘एका दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट’ हा ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम मोडत एकाच दिवशी ५.७० कोटींची कमाई केली.
-
त्यापाठोपाठ आता या चित्रपटाने आणखी एक विक्रम नोंदवला आहे.
-
फक्त ११ दिवसांत ३५.७० कोटी कमावणारा रितेशचा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.
-
हा रेकॉर्ड आधी ‘लय भारी’ चित्रपटाच्या नावे होता.
-
या चित्रपटाने ३५ कोटींची कमाई केली होती.
-
तर ती जागा आता ‘वेड’ने घेतली आहे. ‘वेड’ हा रितेश देशमुखचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
-
तर सोमवारी (काल) या चित्रपटाने २.३५ कोटींची कमाई केली.
-
या चित्रपटाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
-
या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. तर अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…