-
एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाचं भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात कौतुक होत आहे.
-
क्रांतिकारी अल्लूरी सीताराम राजू, कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरात १४०० कोटींची कमाई केली आहे.
-
यावर्षी या चित्रपटाला ऑस्करच्या यादीत स्थान मिळाले आहे त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-
उत्कृष्ट गाण्यांच्या यादीत ‘आरआरआर’च्या ‘नाचो ‘नाचो’ या गाण्याची वर्णी लागली आहे.
-
याच चित्रपटाबद्दल शाहरुख खानने अभिनेता राम चरणला ट्वीटवर शुभेच्छा दिल्या आहेत. “मेगा पॉवर स्टार राम चरण तुमचे खूप खूप आभार. जेव्हा तुमची RRR टीम ऑस्कर भारतात आणेल तेव्हा कृपया मला तिला स्पर्श करायचा आहे.
-
शाहरुखने शुभेच्छा देण्याआधी रामचरणने शाहरुखचे कौतुक केले कारण शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून राम चरण भारावून गेला आहे
-
ट्रेलरमध्ये शाहरुख व दीपिकाचे अॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. तसेच जॉन अब्राहमही यामध्ये भलताच भाव खाऊन गेला आहे.
-
या चित्रपटात शाहरुख खान देशभक्ताच्या भूमिकेत दिसणार आहे तर जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे .फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस / इन्स्टाग्राम
-
सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बहुचर्चित ‘पठाण’ २५ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित