-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते.
-
छोट्या पडद्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता ओंकार भोजने हा आता मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
-
ओंकार भोजने हा लवकरच ‘सरला एक कोटी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आणि गाणी सध्या सुपरहिट ठरताना दिसत आहे.
-
काही महिन्यांपूर्वी ओंकारने झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला.
-
यामुळे अनेक चाहत्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती.
-
आता नुकतंच ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडण्यामागचे कारण सांगितले आहे.
-
त्याबरोबरच त्याने ‘फू बाई फू’ कार्यक्रम करण्याबद्दल स्पष्टपणे सांगितले.
-
“एखाद्या चित्रपटात काम करणे हे एक वेगळं काम आहे. या वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ते बघायला मी स्वत: फार उत्सुक आहे.”
-
“टेलिव्हिजनवर प्रेक्षकांनी मला प्रेम दिलं. मोठ्या पडद्यावरुन पण मला तिच अपेक्षा आहे.”
-
“आपल्याकडे प्राथमिक माध्यमिक असे टप्पे असतात. माझ्याकडे आताच तो वेळ आहे, त्यामुळे आताच मी ते करु शकतो.”
-
“त्यानंतर मला ते करता येतील का याची कल्पना नाही. आता माझं ते करण्याचे वय आहे. त्यामुळेच मी ते करतोय.”
-
“महाराष्ट्राच्या हास्यजत्रा हे सर्व छानच सुरु होतं. पण ते करत असतानाच मला दोन चित्रपटात काम करण्याची संधी आली होती.”
-
“माझ्यामुळे त्यांना सतत तडजोड करावी लागत होती. त्याबरोबरच मलाही ब्रेकची गरज होती.”
-
“तसेच माझी प्रकृती ठीक नसायची. आजही मला त्याची तक्रार जाणवते, म्हणून मी सुट्टी घेतली होती. त्यानंतर मात्र ती कायमस्वरुपी सुट्टी घेतली.”
-
“मी फू बाई फू मध्ये गेलो त्याचं कारण म्हणजे मला एक फोक प्रकार करायचा होता.”
-
“हा प्रकार मला हास्यजत्रेत करता आला नव्हता. ती संधी मला त्या कार्यक्रमात मिळाली म्हणून मी तिथे गेलो.”
-
“विशेष म्हणजे या सगळ्यातून मी शिकत गेलो माझं सध्या चांगलं चाललं आहे”, असे ओंकार भोजने म्हणाला.

Ind Vs Pak : “आता तुझी भुवई जरा…”, शुबमन गिलच्या विकेटनंतर इशारा करणाऱ्या अबरार अहमदवर टीकेचा भडीमार