-
सध्या राजामौलींच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
-
कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडणाऱ्या या चित्रपटाने जागतिक स्तरावरही भारतीय सिनेमाचं नाव उंचावलं आहे.
-
ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सध्या जगभरात चर्चेत आहे.
-
चित्रपटाने ‘नाटू नाटू’ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आहे.
-
ओरिजनल गाण्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार चित्रपटाने नावावर केला आहे.
-
पण, याआधीही काही चित्रपट गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या अगदी जवळ पोहोचले होते. पण त्यांचे पुरस्कार थोडक्यात हुकले होते.
-
१९५७ चा चित्रपट ‘दो आंखे बारह हाथ’ हा गोल्डन ग्लोबसाठी नामांकन मिळालेला पहिला भारतीय चित्रपट होता. व्ही शांताराम आणि संध्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील ए मालिक तेरे बंदे हम हे गाणे खूप गाजले होते.
-
१९६१ मध्ये सत्यजित रे यांनी बंगाली भाषेत ‘द वर्ल्ड ऑफ अप्पू’ नावाचा चित्रपट बनवला. या चित्रपटाला गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्येही नामांकन मिळाले होते, पण पुरस्कार मिळू शकला नव्हता.
-
मीरा नायरचा चित्रपट सलाम बॉम्बे १९८९ मध्ये गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी फीचर फिल्म श्रेणीमध्ये नामांकित झाला होता. पण त्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकता आला नव्हता. (सर्व फोटो स्क्रीन शॉट्स)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…