-
ड्रामा क्वीन राखी सावंतच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
-
तिने बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीबरोबर लग्न केलं आहे. राखीनेच सोशल मीडियाद्वारे फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली.
-
९ मे २०२२लाच राखी व आदिलने लग्न केलं आहे. राखीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये हातात मॅरेज सर्टिफिकेट घेऊन ती उभी आहे.
-
तसेच तिच्या गळ्यात वरमाळाही आहेत. पण लग्न केल्यानंतर राखीने आदिलवर व त्याच्या कुटुंबियांवर काही आरोप केले आहेत.
-
राखी म्हणते, “मी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. त्यावेळी बाहेर अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्याचं एका दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर अफेअर सुरु आहे.”
-
“त्यामुळेच मी माझ्या लग्नाचे गुपित सर्वांसमोर उघडं केलं आहे. मी याबद्दल योग्यवेळी बोलणार आहेच. पण आता मला माझं लग्न वाचावायचं आहे.”
-
“मी आणि आदिलने लग्न केलंय हे जगाला समजायला हवं. मला खूप त्रास होत आहे. त्यामुळेच माझ्या लग्नाबद्दल मी जाहीरपणे सांगून टाकलं आहे.”
-
“आमचं सात महिन्यांपूर्वीच लग्न झालंय. आम्ही आधी कोर्टात लग्न केलंय आणि त्यानंतर निकाह केला. आदिलने मला लग्न लपवून ठेवायला सांगितलं होतं.”
-
“त्यामुळे मी या लग्नाबद्दल ७ महिने लपवून ठेवलं. पण आता आदिल माझ्याशी बोलत नाही. त्याने माझा विश्वासघात केला आहे.”
-
“मला आता लव्ह जिहादची भीती वाटत आहे. कारण आदिलचे कुटुंबिय त्याच्यावर खूप दबाव टाकत आहेत. त्यामुळे तो माझ्याशी बोलत नाही.”
-
या सगळ्या प्रकारामध्ये राखीची आई रुग्णालयामध्ये ब्रेन ट्युमर या आजाराशी लढत आहे. (सर्व फोटो – फेसबुक)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”