-
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं.
-
चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले आहेत.
-
तरीही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा कायम आहे.
-
‘वेड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती.
-
त्यानंतर पहिल्या आठवड्यात २०.६७ कोटींचा गल्ला जमवला.
-
अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.
-
प्रदर्शनाच्या दोन आठवड्यांमध्ये ‘वेड’ने ४० कोटींचा टप्पा पार केला आहे.
-
हा चित्रपट बनवण्यासाठीही कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला.
-
रितेशच्या या चित्रपटाचा बजेट १५ कोटी रुपये इतपत होता असं बोललं जात आहे.
-
म्हणजेच १५ कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.
-
रितेश व जिनिलीयाचा ‘वेड’ ५० कोटी रुपयांचा पल्ला गाठणार का? हे पाहावं लागेल. (सर्व फोटो – फेसुबक)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO