-
सध्या सर्वत्र मकरसंक्रांतची धामधूम पाहायला मिळत आहे.
-
तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला, असे म्हणत तिळगुळ वाटून प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
-
सध्या अनेक सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहात मकरसंक्रांतीचा सण साजरा करताना दिसत आहे.
-
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अनेक कलाकारांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
-
याचे अनेक फोटो या कलाकारांनी शेअर केले आहेत.
-
अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांची यंदाची पहिलीच मकरसंक्रांत आहे.
-
यानिमित्ताने त्या दोघांनीही हलव्याचे दागिने परिधान करत फोटो पोस्ट केले आहेत.
-
तर अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर यांनीही काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील काळ्या रंगाच्या साडीतील एक गोड फोटो शेअर केला आहे.
-
तर अभिनेत्री माधवी निमकरनेदेखील एक खास फोटो शेअर करत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अभिनेत्री पूजा सावंत हिने हटके अंदाजात चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनेदेखील काळ्या रंगाची साडी परिधान करत चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई