-
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्या सौंदर्याचे आजही लोक वेडे आहेत. मात्र, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्नही आहे की रेखा कोणाच्या नावाने कपाळावर कुंकू लावतात?
-
रेखा जेव्हाही कोणत्याही पार्टीत किंवा फंक्शनमध्ये दिसतात, तेव्हा त्यांच्या कपाळावर कुंकू असतेच.
-
भारतीय संस्कृतीमध्ये कपाळावरील कुंकू हे स्त्रीच्या सौभाग्याचे लक्षण आहे. मात्र अविवाहित रेखा आपल्या कपाळी कोणाच्या नावे कुंकू लावतात हे गूढ अद्याप उलगडलेले नाही.
-
१९८० मध्ये रेखा ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांच्या लग्नात सिंदूर परिधान करून पोहोचल्या होत्या. यावेळी रेखा यांच्या कपाळावरील सिंदूर प्रकाशझोतात आले. या लग्नात रेखा यांनी अमिताभ यांच्या नावाने सिंदूर लावल्याची चर्चा रंगली होती.
-
हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रेखा यांनी सांगितल्याप्रमाणे, या लग्नाला त्या शूटिंगवरून थेट आल्या होत्या व मंगळसूत्र व कुंकू काढायला विसरल्या होत्या.
-
खरंतर एक काळ असा होता की रेखा अमिताभ बच्चनच्या प्रेमात अखंड बुडालेल्या होत्या. रेखा आणि अमिताभ यांची लव्हस्टोरी १९८० च्या दशकात चर्चेत होती. मात्र, त्यांचे प्रेम यशस्वी होऊ शकले नाही आणि अमिताभ बच्चन यांनी जया भादुरीशी लग्न केले.
-
असं म्हणतात की रेखा त्यांच्या कपाळावर अमिताभ यांच्या नावाने कुंकू लावतात. तथापि, काही लोक असेही म्हणतात की रेखा सुंदर दिसण्यासाठी त्या भांगेत सिंदूर भरतात.
-
तसे, रेखा यांचे आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. रेखा यांना त्यांचे प्रेम कधीच मिळाले नाही. अमिताभ बच्चन यांच्यावर त्यांनी मनापासून प्रेम केले पण ते त्यांचे होऊ शकले नाहीत.
-
यानंतर त्यांच्या आयुष्यात त्यांचे नाव अनेक कलाकारांशी जोडले गेले, पण त्यांचा सहवास कोणाशीही जास्त काळ टिकू शकला नाही.
-
रेखा यांना एकदा नव्हे तर अनेक मुलाखतींमध्ये वारंवार विचारण्यात आले होते की त्या कोणाच्या नावाने सिंदूर लावतात. पण त्याबद्दल त्या कधीच बोलल्या नाहीत.
-
एका मुलाखतीत त्यांनी एवढेच सांगितले होते – “मी ज्या शहरातून आले आहे तिथे सिंदूर लावण्याची फॅशन आहे. मला असे वाटते की सिंदूर मला शोभतो.”
-
एव्हरग्रीन रेखा अनेक वर्षांपासून आपल्या वांद्रे येथील घरात एकाकी जीवन जगत आहे. फक्त त्याची सेक्रेटरी फरहानालाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबबत माहिती आहे. (फोटो: Instagram – legendaryrekha/इंडियन एक्सप्रेस)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य