-
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.
-
जावेद अख्तर यांचं पहिलं लग्न हनी इराणी यांच्याशी झालं होतं. १९७२ साली दोघांचं लग्न झालं होतं. पण नंतर शबाना आझमींमुळे दोघेही विभक्त झाले होते.
-
सीता-गीता चित्रपटाच्या सेटवर जावेद व हनी यांची भेट झाली होती. त्यानंतर हनी यांनी वयाच्या १७व्या वर्षी जावेद अख्तर यांच्याशी लग्न केलं होतं. जावेद आणि हनी यांना झोया व फरहान ही दोन अपत्ये होती.
-
शबानाही त्या काळातली तरुण अभिनेत्री होती. त्या कैफी आझमी यांच्या कन्या होत्या. जावेद त्यांच्या घरी जायचे. इथूनच शबाना आणि जावेद यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली होती.
-
दोघांनीही लग्न करायचं होतं, पण जावेद विवाहीत होते.तसेच शबानाच्या आईचाही या नात्याला विरोधा होता.
-
इकडे हनी यांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना धक्का बसला आणि जावेद यांच्याशी होणाऱ्या वादाचं कारणही समजलं.
-
हनी यांना जावेद अख्तर यांच्या अफेअरबद्दल कळताच त्यांनी जावेद यांना शबानाजवळ जाण्यास सांगितलं. आपल्या पतीचं आपल्यावर प्रेम नसेल तर थांबवणार तरी कसं, असा विचार त्यांनी केला. त्यानंतर मुलगा फरहान आणि मुलगी झोयाला त्यांनी स्वतःजवळ ठेवलं.
-
लग्नाच्या अवघ्या सहा वर्षांनी १९७८ मध्ये त्यांनी मुलांना न सांगता वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांचा घटस्फोट झालेला नसल्यामुळे जावेद शबानाशी लग्न करू शकत नव्हते.
-
जावेद यांच्य़ाशी लग्न करण्यासाठी शबाना यांना त्यांच्या आईलची मनधरणी करावी लागली होती.
-
त्यामुळे १९८४ साली त्यांनी हनी यांना घटस्फोट दिला आणि नंतर शबानाशी लग्न केलं.
-
जावेद अख्तर व शबाना आझमी यांच्या लग्नाची त्या काळी खूप चर्चा झाली होती. दरम्यान, फरहान व झोया यांच्याबरोबर शबानांचं चांगलं बाँडिंग आहे.
-
(सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”