-
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन ६ वर्षे उलटली आहेत.
-
हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता.
-
या चित्रपटातील काही सीन तर प्रेक्षकांमध्ये फार लोकप्रिय झाले होते.
-
या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका होत्या.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी केले होते.
-
नुकतंच एका कार्यक्रमात नागराज मंजुळेंनी या चित्रपटाबद्दल विविध खुलासे केले.
-
यावेळी नागराज मंजुळे म्हणाले, “माझ्यासारख्या खेड्यातील दगड फोडणाऱ्याच्या मुलाला मी काही तरी करू शकतो, या आत्मविश्वासानं इथपर्यंत आणलं.”
-
“आपल्याकडे ज्ञानेश्वर, तुकाराम असे थोर संत झाले.”
-
“काही मावळ्यांना घेऊन साम्राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून प्रचंड यश मिळवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले प्रेरणास्त्रोत आहेत.”
-
“त्यामुळे भावी पिढीनं आत्मविश्वास बाळगून कष्ट करत राहून काही तरी करून दाखवणं, हे महत्त्वाचं आहे.”
-
“एखादा चांगला चित्रपट बनवण्यासाठी तांत्रिक शिक्षण आवश्यकच असतं असं नाही, पण त्याचा उपयोग नक्कीच होतो.”
-
“सैराट चित्रपट हा म्हटला तर माझ्या जीवनाशी निगडित आहे आणि म्हटला तर नाही.”
-
“पण ते महत्त्वाचं नसून तो आपल्या वास्तवाशी संबंधित आहे की नाही, हे महत्त्वाचं आहे”, असे नागराज मंजुळेंनी म्हटले.
-
दरम्यान नागराज मंजुळे हे लवकरच ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख