-
आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि बहारदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
-
आता ती चर्चेत आली आहे सिन्नर तहसीलदार कार्यालयाने थकबाकीसंदर्भात नोटीस पाठवल्यामुळे.
-
पण ऐश्वर्याची संपत्ती किती आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
-
ती एका चित्रपटासाठी १०-१२ कोटी मानधन आकारते.
-
ती लोरियल, लक्स, नक्षत्र डायमंड ज्वेलरी, टायटन, लोधा ग्रुप, कल्याण ज्वेलर्स यांसारख्या मोठ्या ब्रँडची अॅम्बेसिडरही आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या फक्त ब्रँडच्या जाहिरातींमधून वर्षाला ८०-९० कोटी कमावते.
-
ती एक बिझनेसवुमन देखील आहे. तिने अनेक स्टार्टअप्समध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहेत.
-
तसेच तिचे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये २१ कोटींचे अपार्टमेंट आहे.
-
त्याचबरोबर अभिषेक आणि ऐश्वर्याने यांनी दुबईच्या जुमेराह गोल्फ इस्टेटमधील सॅंक्च्युरी फॉल्समध्ये पॅलेससारखा व्हिलाही खरेदी केला आहे.
-
त्याचबरोबर ऐश्वर्या तिच्या कुटुंबासोबत ‘जलसा’मध्ये राहते त्या बंगल्याची किंमत आजच्या घडीला ११२ कोटी आहे.
-
भारतात आणि परदेशात मिळून तिची ७७५ कोटींची संपत्ती आहे.
-
तिने ही संपत्ती फक्त चित्रपटांत कामं करूनच नाही तर प्रॉपर्टी आणि इतर अनेक गुंतवणुकीतून कमावली आहे.

Devendra Fadnavis : मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “दोन्ही ठाकरे एकत्र आले तर…”