-
‘दृश्यम २’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात तब्बू एका तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली.
-
तब्बूने आजवर आपल्या अभिनयामधून लूकमधून प्रेक्षकांचं खास वेधून घेतलं आहे. नुकतीच ‘कुत्ते’ चित्रपटातदेखील दिसली आहे.
-
‘दृश्यम २’च्या यशानंतर ती आता पुन्हा एका खाकी वर्दीत दिसणार आहे. ती आता भोला चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
अजय देवगणने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तसेच तो या चित्रपटात कामदेखील करणार आहे.
-
नुकताच अजय देवगणने चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला होता आता त्याने तब्बूचा लूक शेअर केला आहे.
-
हातात बंदूक घेऊन तब्बू दिसत आहे. तिच्या चाहत्यांना आता चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले होते. हा चित्रपट थरारपट असणार आहे.
-
‘भोला’ हा तमिळ ब्लॉकबस्टर ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे. २०१९ मध्ये हा प्रदर्शित झाला होता.
-
हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. फोटो सौजन्य : तब्बू इन्स्टाग्राम

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच