-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, महाराष्ट्रातील तमाम महिलांचे भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर यांचा आज वाढदिवस.
-
आजपर्यंतच्या त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांची.
-
या दोघांचा प्रेमविवाह आहे.
-
सुचित्रा यांच्या घरून आदेश आणि त्यांच्या प्रेमाला विरोध असल्यामुळे त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. पण त्यापूर्वीची यांची प्रेमकहाणी खूप हटके आहे.
-
आदेश बांदेकर यांनी सुचित्राला प्रपोज केल्यावर सुचित्रा यांनी त्या क्षणी आदेशला होकार दिला होता. यानंतर या दोघांचं भेटणं वाढू लागलं.
-
सुचित्राचे वडील खूप कडक शिस्तीचे असल्यामुळे त्यांचा या दोघांना खूप धाक वाटायचा. त्यांना अजिबात कळू न देता ही दोघं भेटत असत.
-
रुपारेल कॉलेजमध्ये शिकत असताना एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते.
-
तेथून बाहेर निघताना ते गप्पा मारत असतानाच सुचित्रा यांचे वडील समोर आले.
-
सुचित्राने वडिलांना येताना पाहिले आणि लगेच आदेशला म्हणाल्या, “दादा आले.”
-
अचानक सुचित्राचे वडील तिथे पोहोचल्याने क्षणाचाही विलंब न करता आदेश यांनी तिथून पळ काढला आणि किचनमध्ये जाऊन लपले.
-
सुचित्राच्या वडिलांना ते आदेश बांदेकर होते असा संशय आला.
-
त्यामुळे त्यांनी आजूबाजूला असलेल्या लोकांना याबद्दल विचारणा केली. परंतु कोणीही ठोस उत्तर दिलं नाही.
-
तेवढ्यात आदेश आतमधून वेटरच्या कपड्यात आले आणि सुचित्रा यांच्या वडिलांसमोरून निघून गेले.
-
आदेश वेटरच्या कपड्यात असल्याने सुचित्राच्या वडिलांना त्यांना ओळखता आले नाही.
-
हा प्रसंग आजही त्या दोघांच्या लक्षात आहे.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विधान, “शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही, त्यांनी मला…”