-
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखचा ‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करत आहेत.
-
‘वेड’ चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर जिनिलीयाने या चित्रपटाच्या निमित्ताने १० वर्षांनी कलाविश्वात पुनरागमन केलं आहे.
-
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच कोटींची कमाई करणारा हा चित्रपट अवघ्या तीन आठवड्यांतच ५० कोटींच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे.
-
‘वेड’ चित्रपटाला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून भारावलेल्या रितेश देशमुखने चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा केली आहे.
-
येत्या शुक्रवारी म्हणजेच २० जानेवारीला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
-
एडिट केलेले काही सीन्स व सत्या-श्रावणीचं रोमॅंटिक गाणं चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
-
‘वेड’ चित्रपटाच्या नवीन व्हर्जनबरोबरच आणखी एक खुशखबर प्रेक्षकांसाठी आहे.
-
२० जानेवारीला ‘वेड’ चित्रपट फक्त ९९ रुपयांत पाहता येणार आहे. येत्या शुक्रवारी ‘सिनेमा लव्हर्स डे’ सेलिब्रेट करण्यात येणार आहे.
-
यानिमित्ताने चित्रपटगृहांत मराठी, हिंदी अशा सगळ्या चित्रपटांची तिकिटं केवळ ९९ रुपयांना उपलब्ध असणार आहेत.
-
त्यामुळे महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या रितेश देशमुखच्या चित्रपटाबरोबर ‘वाळवी’ हा नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपटही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत फक्त ९९ रुपयांत पाहता येईल.
-
(सर्व फोटो: आयएमडीबी,लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई