-
हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
-
पामेलाची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. तिला प्लेबॉय मॉडेल ते सेक्स सिम्बॉल या नावानं ओळखलं जातं.
-
पामेला अँडरसनच्या जीवनावर आता एक डॉक्युमेंट्री बनवण्यात आली असून त्याचे नाव ‘Pamela, a love story’ आहे.
-
पामेला अँडरसनच्या वादग्रस्त आयुष्यामुळे ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आहे. याचा पहिला ट्रेलर रिलीज झाला आहे.
-
डॉक्युमेंट्रीमध्ये ५५ वर्षीय कॅनेडियन-अमेरिकन अभिनेत्री पामेलाच्या लीक झालेल्या सेक्स टेपपासून ते तिच्या लव्ह स्टोरीचे सर्व पैलू प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे.
-
आपणही त्या निमित्ताने पामेला अँडरसनच्या लव्ह स्टोरी आणि तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.
-
पामेला अँडरसन एक अभिनेत्री, मॉडेल आणि कार्यकर्ती आहे. पामेला अँडरसनने बेवॉच आणि होम इम्प्रूव्हमेंटमधून अभिनेत्री म्हणून लोकप्रियता मिळवली.
-
पामेला अँडरसनला टीव्ही बॉम्बशेल म्हणूनही ओळखलं जातं.
-
तिने पाच लग्ने केली आहेत. पामेला प्लास्टिक सर्जरीसाठी देखील चर्चेत आली होती.
-
१९९१ मध्ये पामेला अँडरसनच्या करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तिचा संपूर्ण लुकच बदलला आहे.
-
अभिनेत्रीने ब्रेस्ट मोठे करण्यासाठी सर्जरी केल्याची कबुलीही दिली होती.
-
१९९४ साली तिने Bret Michaels ला डेट केलं होतं. पुढच्या वर्षी १९९५ मध्ये पामेलाने टॉमी ली या ड्रमरशी लग्न केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पामेलाने चार दिवसांच्या भेटीतच त्याच्याशी लग्न केलं होतं.
-
तिच्या लग्नाची आजही चर्चा होते. कारण दोघांनी त्यांच्या हनीमूनला एक सेक्स टेप बनवली होती, जी कोणीतरी चोरून लीक केली होती.
-
नंतर १९९८ साली तिचा घटस्फोट झाला.त्यानंतर पामेलाने पुन्हा ब्रेस्ट सर्जरी केली आणि तिचा लूक बदलला. यावेळी तिने ब्रेस्ट कमी करण्यासाठी सर्जरी केली होती.
-
परंतु नंतर तिसऱ्यांदा सर्जरी करत तिने पुन्हा आधीचाच लूक मिळवला.
-
दरम्यान, २००६ मध्ये पामेलाने गायक किड रॉकसोबत लग्न केलं. पण लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला.
-
पुढच्याच वर्षी २००७ मध्ये, पामेलाने रिक सॉलोमनशी तिसरं लग्न केलं. पण तिचं तिसरं लग्नही टिकलं नाही आणि ते वेगळे झाले.
-
आश्चर्याची बाब म्हणजे रिक सॉलोमनशी घटस्फोट घेतल्यानंतर पामेलाने २०१४ मध्ये त्याच्याशी पुन्हा लग्न केलं आणि त्यानंतर २०१५ मध्ये दुसऱ्यांदा घटस्फोट घेतला.
-
पामेलाने वयाच्या ५२ व्या वर्षी ७४ वर्षीय जॉन पीटर्ससोबत चौथं लग्न केलं. पण पामेला आणि जॉन पीटर्सचे लग्न केवळ १२ दिवस टिकलं.
-
यानंतर २०२० मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर पामेलाने तिचा बॉडीगार्ड डॅन हेहर्स्टसोबत लग्न केले.
-
डॅन हेहर्स्ट हा पामेलाचा पाचवा नवरा होता. पण अभिनेत्रीचं हे लग्नही टिकलं नाही. दोन वर्षांनंतर पामेला आणि डॅन हेहर्स्ट जानेवारी २०२२ मध्ये वेगळे झाले.
-
याशिवाय अभिनेत्रीने ती लहान असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचंही म्हटलं होतं.
-
पामेला भारतीय रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये देखील दिसली होती. या शोसाठी तिने मोठी रक्कम आकारली होती.
-
(सर्व फोटो पामेला अँडरसनचे इन्स्टाग्राम व इंडियन एक्सप्रेसवरून साभार)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO