-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरेचा आज वाढदिवस आहे. अफलातून अभिनय शैलीने गौरव प्रेक्षकांना पोट धरुन हसवतो.
-
विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या गौरवचं फॅन फॉलोविंगही प्रचंड आहे.
-
फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असलेल्या गौरवने हास्यजत्रेसाठी अनेक ऑडिशन दिल्या होत्या.
-
गौरवच्या अभिनयाप्रमाणेच त्याच्या झुपकेदार केसांची प्रेक्षकांना भूरळ पडते.
-
एका मुलाखतीत गौरवने त्याच्या झुपकेदार केसांबाबत भाष्य केलं होतं.
-
“तू असे केस का वाढवले आहेस?”, असा प्रश्न त्याला ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला होता.
-
यावर उत्तर देत गौरवने, “एक वेळ अशी होती, जेव्हा मला काम मिळत नव्हतं. म्हणून म्हटलं केस वाढवून बघुया” असं म्हटलं होतं.
-
याच झुपकेदार केसांमुळे गौरवला गुगलच्या जाहिरातीची ऑफर मिळाली होती. तो किस्साही त्याने मुलाखतीत शेअर केला होता.
-
“माझ्या झुपकेदार केसांमुळेच मला गुगलची अॅड मिळाली. तुमचा लूक खूप छान आहे, असं ते म्हणाले. त्यानंतर मला पुढे लूकमुळेच काम मिळत गेलं”, असंही गौरवने सांगितलं.
-
गौरवने मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. ‘हवाहवाई’ चित्रपटात त्याने सिद्धार्थ जाधवसह स्क्रीन शेअर केली होती.
-
(सर्व फोटो: गौरव मोरे/ इन्स्टाग्राम)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य