-
बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेलं कपल म्हणून रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणला ओळखलं जातं.
-
त्या दोघांच्या केमिस्ट्रीचे लाखो चाहते आहेत.
-
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा नुकताच पार पडला.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली.
-
रणवीर-दीपिकाने अंबानींच्या धाकट्या लेकाच्या साखरपुडा सोहळ्याला हजेरी लावली.
-
त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.
-
यावेळी ते दोघेही अगदी हातात हात घालून, राजेशाही थाटात अंनत-राधिकाच्या साखरपुड्यासाठी पोहोचले.
-
यावेळी दीपिकाने गडद लाल रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती.
-
त्याबरोबर तिने गळ्यात छान चोकर आणि नेकलेसही परिधान केला होता.
-
या लूकला मॅच करण्यासाठी दीपिकाने सुंदर मेकअपही केला होता.
-
तर रणवीरने गडद निळ्या रंगाचा कुर्ता, जॅकेट असा लूक केला होता.
-
यावेळी रणवीर हा दीपिकाच्या लूकची काळजी करताना दिसला.
-
दीपिकाने परिधान केलेल्या साडीमुळे तिला चालताना अडचणी येत होत्या.
-
यावेळी रणवीर तिची साडी योग्य आहे की नाही याची खात्री करुन हसत हसत फोटोसाठी पोज दिली.
-
त्या दोघांमधील केमिस्ट्री पाहून चाहतेही भारावले.
-
दीपिकाने परिधान केलेल्या या साडीवर सर्वांच्याच नजरा खिळल्या.
-
तिने परिधान केलेल्या साडीचा ब्लाऊज छान डिझाईन केलेला होता.
-
दीपिकाने या सोहळ्यासाठी परिधान केलेली साडी तोराणी या ब्रँडची आहे.
-
या साडीचे नाव सिंदूरी ताशी साडी असे आहे.
-
या साडीची किंमत तब्बल १ लाख ४९ हजार ५०० रुपये इतकी आहे.
-
दरम्यान दीपिका ही ‘पठाण’ चित्रपटात झळकणार आहे. येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Champions Trophy: यजमान पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष फायनलनंतर स्टेजवर का उपस्थित नव्हते? वसीम अक्रमने सांगितलं कारण