-
काही कलाकार हे टेलिव्हिजन आणि रुपेरी पडद्यावर अगदी सहज वावरतात आणि दोन्ही माध्यमातील प्रेक्षकांना त्यांचं काम प्रचंड आवडतं.
-
या काही कलाकारांमधील एक महत्त्वाचं नाव म्हणजे अभिनेत्री अश्विनी काळसेकर.
-
खलनायिका ते विनोदी भूमिका अगदी लीलया पेलणाऱ्या अश्विनीचा एक मोठा चाहतावर्ग आहे.
-
‘गोलमाल’, ‘खाकी’, ‘रक्तचरित्र’पासून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सर्कस’पर्यंत तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतात.
-
२००६ ते २००९ या दरम्यान अश्विनीने रंगवलेली ‘कसम से’ या मालिकेत ‘जिज्ञासा वालिया’ खलनायकी भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.
-
याप्रमाणेच ‘सीआयडी’मधील अश्विनीची कामाचीही खूप प्रशंसा झाली.
-
२२ जानेवारी १९७० रोजी मुंबईत जन्मलेल्या अश्विनीने शिक्षण पूर्ण झाल्यावर एका एअरलाईन्स कंपनीत नोकरी केली. ती केबिन क्रू मेंबर म्हणून काम करत होती.
-
शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी अश्विनी काही ठिकाणी ऑडिशन्सला जायची, आणि अशा रीतीने तिला कबीर भाटिया यांची मंदीरा बेदीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शांती’ या मालिकेत काम मिळालं.
-
अश्विनीला सर्वात मोठा ब्रेक देणारी मालिका म्हणजे ‘कसम से’. यातील तिची जिज्ञासा वालिया ही भूमिका लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली.
-
जिज्ञासाचा लुक खूप गाजला. डार्क काजळ, मोठी टिकली, आणि नाकातील मोठी नोज पिन ही तिची सिग्नेचर स्टाईल ठरली.
-
अश्विनीने रामगोपाल वर्मा, एकता कपूर, रोहित शेट्टी, श्रीराम राघवन यांच्यासारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केलं आहे.
-
आज अश्विनी तिचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. (फोटो : अश्विनी काळसेकर / इन्स्टाग्राम)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन