-
बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरचा आज वाढदिवस आहे. नम्रता आज तिचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
२२ जानेवारी १९७२ रोजी एका मराठी कुटुंबात नम्रताचा जन्म झाला. १९९३ मध्ये मिस इंडियाचा ताज जिंकून नम्रता पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आली होती. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले.
-
दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून महेश बाबूशी लग्न केल्यानंतर नम्रताने सिनेसृष्टीला रामराम केला.
-
आता तब्बल १७ वर्षांनी नम्रताने चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्यामागचे कारण सांगितले आहे.
-
नुकतंच नम्रताने तिने लग्नानंतर करिअर का सोडले याबद्दलचे कारण सांगितले आहे.
-
एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या निर्णयाचा खुलासा केला.
-
“मी खूप आळशी होते. मी नेहमी ठरवायचे त्याप्रमाणे काहीही घडायचं नाही. जे काही घडलं ते आपोआप घडलं.”
-
“पण मी जे निर्णय घेतले ते योग्य होते आणि मी त्यात आनंदी आहे, असं मला वाटते.”
-
“मला मॉडेलिंगचा कंटाळा आल्यामुळे मी अभिनय क्षेत्रात आले. मॉडेलिंगनंतर अभिनय ही पुढची पायरी होती.”
-
“त्यानंतर मी माझ्या कामाचा आनंद घेऊ लागले.”
-
“अभिनयाला गांभीर्याने घेऊ लागले तेव्हा मला महेश भेटला. आमचं लग्न झालं.”
-
“त्यामुळे जर तेव्हा मी माझं काम गांभीर्याने घेतलं असतं तर माझं आयुष्य आतापेक्षा खूप वेगळं असतं.”
-
“पण मी काही तक्रार करत नाही.”
-
“महेश आणि मी लग्न करण्याचा निर्णय घेतला तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता.”
-
“त्यानंतर माझं सगळं जगच बदलून गेलं. मला लग्नाचा अनुभव चांगला वाटत होता.”
-
“त्यामुळे मी कोणताही चुकीचा निर्णय घेतला असे मला वाटत नाही”, असेही नम्रताने म्हटले.
-
दरम्यान महेश-नम्रताने चार वर्ष एकमेकांना डेट करत होते.
-
नम्रता आणि महेश बाबू यांनी २००५ मध्ये त्यांच्या ‘अथाडू’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर लग्न केलं.
-
लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली. मात्र महेश बाबू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार झाला.
-
नम्रता सध्या कुटुंबासह हैदराबादमध्ये राहते. ती आता चित्रपट निर्माती बनली आहे.
