-
अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टीचं आज लग्न आहे.
-
ती क्रिकेटपटू केएल राहुलबरोबर लग्न करत आहे.
-
गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेले अथिया व राहुल आज खंडाळामध्ये लग्नगाठ बांधत आहे.
-
अथिया शेट्टीने आतापर्यंत फक्त ४ चित्रपटांमध्ये काम केलंय. तिच्या चित्रपटांनी खूप चांगली कामगिरी केली नव्हती.
-
तरीही अथियाच्या संपत्तीवर नजर टाकल्यास ती कोट्यवधींच्या घरात आहे.
-
अथिया शेट्टी एका महिन्यात ८० लाख रुपये कमवते.
-
अथियाने २०१५ मध्ये हिरो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. २०१७ च्या मुबारकान चित्रपटात तिने काम केले होते.
-
त्यानंतर २०१८ मध्ये नवाबजादे आणि २०१९ मध्ये मोतीचूर चकनाचूर या चित्रपटांमध्ये ती दिसली होती.
-
अथियाने तिच्या करिअरमध्ये फक्त ४ चित्रपट केले आहेत, ज्यापैकी एका चित्रपटात तिने कॅमिओ केला आहे.
-
अथियाची एकूण संपत्ती २९ कोटी रुपये आहे. ती वर्षाकाठी १० कोटी रुपये कमवते.
-
अथियाकडे जॅग्वार एक्सएफ कार आहे, तिची किंमत सुमारे ५५.६७ लाख रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे मर्सिडीज बेंझ एस-क्लास सारखी खूप महागडी कार आहे. या कारची किंमत सुमारे २.१७ कोटी आहे.
-
अथिया अनेक ब्रँडच्या जाहिरातीतूनही पैसे कमावते आणि ती एका ब्रँडकडून सुमारे ४० ते ५० लाख रुपये चार्ज करते.
-
तर, क्रिकेटपटू केएल राहुल वर्षाकाठी ३० कोटी रुपये कमवतो. (सर्व फोटो – अथिया शेट्टी इन्स्टाग्राम)
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई