-
सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल राहुल आज विवाह बंधनात अडकणार आहेत.
-
सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्याच्या बंगल्यावर हा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे.
-
२०१४मध्ये तिने आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीबरोबर ‘हीरो’ चित्रपटात काम केले. ते फक्त पडद्यावरचे हिरो हिरॉइन नाहीत, तर त्यांच्या खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
-
अथिया शेट्टीचे काही जवळचे मित्र आहेत. टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ हे त्यापैकी आहेत. तिने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत जाऊन IB प्रोग्राम शिकण्यासाठी गेली होती.
-
अथिया शेट्टीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. ती अनेकदा वडील सुनील शेट्टी यांच्याबरोबर चित्रपटाच्या सेटवर जायची. तिने एकदा खुलासा केला की तिने ‘उमराव जान’ च्या सेटला भेट दिली होती.
-
अथिया शेट्टीने एकदा एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिच्या घरी कधीही चित्रपट मासिकांना परवानगी नव्हती.
-
अभिनयाची आवड असल्याने तिने शाळेत अनेक नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
-
अथियाने खुलासा केला होता की श्रद्धा कपूर एक हुशार विद्यार्थी होती कारण ती नाटकांमध्ये काम करायची, नाचायची आणि गायची. तिच्या माझ्यावर कायम धाक असायचा.
-
अथिया शेट्टीने आतापर्यंत फक्त ४ चित्रपटांमध्ये काम केलंय. तिच्या चित्रपटांनी खूप चांगली कामगिरी केली नव्हती. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम / इंडियन एक्सप्रेस
…म्हणून कुणालाच कमी समजू नका! शिकारीसाठी आलेल्या वाघाचा माकडाने केला मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video