-
अभिनेत्री अथिया शेट्टी व केएल राहुल सोमवारी २३ जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकले.
-
ग्न पार पडल्यानंतर दोघांनी फोटो शेअर केले. तसेच फार्म हाऊसमधून बाहेर येत माध्यमांना पोजही दिल्या.
-
दोघेही लग्नाच्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. अथिया व राहुलवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
अथिया व राहुलच्या लग्नाच्या कपड्यांनी चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. दोघांनी साधे पण डिझायनर कपडे लग्नासाठी पसंत केले होते.
-
अथिया शेट्टीने अनामिका खन्नाने डिझाईन केलेला पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
-
डिझायनर अनामिका खन्नाने खूप मेहनत घेत हा लेहेंगा डिझाईन केला व तो बनवून घेतला होता.
-
अथियाचा लेहेंगा पूर्णपणे हाताने बनवलेला, हाताने विणलेला होता.
-
त्यावर जरदोजी आणि जाळी वर्कसह सिल्कचे वर्क होते.
-
तिचे ब्लाऊज आणि दुपट्टा सिल्क ऑर्गन्झाचा बनलेला होता.
-
हा सुंदर लग्नाचा लेहेंगा तयार करण्यासाठी जवळपास १० हजार तास लागले होते, म्हणजे तब्बल ४१६ दिवसांच्या मेहनतीनंतर हा लेहेंगा तयार झाला होता.
-
पेस्टल लेहेंग्याबरोबर एक मोठा हार, मॅचिंग कानातले, मांग टिका मोजक्याच दागिन्यांनी अथियाने तिचा लूक पूर्ण केला होता.
-
(सर्व फोटो – अथिया शेट्टी इन्स्टाग्राम व सोशल मीडियावरून साभार)

रामनवमीला निर्माण होतो आहे दुर्मिळ संयोग, ‘या’ ३ राशींच्या लोकांवर होईल प्रभु श्री रामाची कृपा