-
मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक असलेले दिग्दर्शक म्हणजे सुभाष घई.
-
मनोरंजनसृष्टीतील या दुसऱ्या शोमॅनचा आज वाढदिवस आहे.
-
त्यांनी ‘परदेस’, ‘कर्मा’, ‘राम लखन’, ‘ताल, यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
-
सुभाष घई यांनी त्यांची कारकीर्द अभिनयापासून सुरू केली, पण नंतर त्यांनी आपला मोर्चा दिग्दर्शन आणि निर्मितीकडे वळवला.
-
८० आणि ९० च्या दशकात एकापाठोपाठ एक सुपरहीट चित्रपट देणारे सुभाष घई सध्या या क्षेत्रापासून बरेच लांब आहेत, त्यांनी दिग्दर्शनही थांबवलं आहे, पण त्यांचं लिखाण आणि निर्मिती क्षेत्रात काम सुरू आहे.
-
सध्या सुभाष घई त्यांच्या मुंबईच्या अॅक्टिंग स्कूलकडे लक्ष देत आहेत. २०१४ मध्ये त्यांनी ‘कांची द अनब्रेकेबल’ या शेवटच्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. नंतर त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती आणि लिखाण केलं, पण दिग्दर्शन पूर्णपणे बंद केलं आहे.
-
सुभाष घई यांनी दिग्दर्शनातून निवृत्ती का घेतली यांचं नेमकं कारण फक्त तेच सांगू शकतात, पण २०१८ मध्ये एका कॉंट्रोवर्सीनंतर त्यांनी या क्षेत्रापासून फारकत घ्यायला सुरुवात केली.
-
२०१८ मध्ये मीटू प्रकरणात एका तरुणीने सुभाष घई यांचं नाव घेतलं आणि त्यानंतरच त्यांनी दिग्दर्शनापासून लांब राहायचा निर्णय घेतला असं म्हंटलं जातं.
-
मुंबई पोलिसांकडून त्यांना या प्रकरणात क्लीन चीटदेखील देण्यात आली, पण त्यानंतर आजपर्यंत सुभाष घई हे पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसले नाहीत, त्यांचे चाहते आजही त्यांच्या पुनरागमनाची वाट पहात आहेत. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”