-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट उद्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
-
‘बेशरम रंग’ गाण्यामुळे पठाण बॉयकॉट ट्रेण्डमध्ये अडकला होता. परंतु, याचा चित्रपटावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.
-
या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच अडव्हान्स बुकिंगमधून तब्बल २४ कोटींची कमाई शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने केली आहे.
-
शाहरुख खानच्या ‘पठाण’ची क्रेझ संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला शाहरुखच्या पठाणने वेड लावलं आहे.
-
सांगलीत शाहरुखच्या चाहत्याने ‘पठाण’ चित्रपटासाठी संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे.
-
तर बीड जिल्ह्यात ‘पठाण’ चित्रपटासाठी ४०० हून अधिक स्क्रीनचं बुकिंग करण्यात आलं आहे.
-
अमरावतीतील तरुणांनी ‘पठाण’च्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे.
-
औरंगाबादमध्ये शाहरुखच्या चाहत्यांनी ‘पठाण’ चित्रपटातील त्याच्या लूकचं ५० फूटचं पोस्टर लावणार असल्याचं सांगितलं आहे.
-
नागपूरमध्ये शाहरुखच्या चाहत्याने त्याची मिमिक्री करत प्रेक्षकांना ‘पठाण’ चित्रपट पाहण्यासाठी आवाहन केलं आहे.
-
शाहरुखने ट्विटरवर #AskSRK सेशन घेतलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्रातील त्याच्या चाहत्यांनी अशाप्रकारे पठाण चित्रपटासाठी उत्सुकता दाखविली आहे.
-
शाहरुख खानबरोबर या चित्रपटात दीपिका पदुकोण व जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (सर्व फोटो: ट्वीटर)
Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कुठल्या महिन्यापासून मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही…”