-
मागील अनेक दिवसांपासून क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेता सुनिल शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी यांच्या लग्नाची चर्चा होती.
-
त्यांनी खंडाळा येथे २३ जानेवारी रोजी लग्न केले आहे.
-
मागील बऱ्याच दिवसांपासून या विवाहासाठी तयारी केली जात होती.
-
दरम्यान, या विवाहानंतर अथिया आणि केएल राहुल या जोडीला अनेकजण भेटवस्तू देत आहेत.
-
अभिनेता अनिल कपूर, सलमान खान, जॅकी श्रॉफ यांनी या जोडप्याला महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.
-
तसेच क्रिकेटपटू विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी यांनीही या नव्या जोडीला कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्याची चर्चा आहे.
-
अथिया शेट्टीचे वडील सुनिल शेट्टी यांनी या नव्या जोडीला मुंबईत एक आलिशान फ्लॅट भेट म्हणून दिल्याचे म्हटले जात आहे. या फ्लॅटची किंमत ५० कोटी असल्याचे सांगितले जात आहे.
-
तर सलमान खानने अथियाला तब्बल १.६४ कोटी रुपयांची कार गिफ्ट म्हणून दिल्याचे म्हटले जात आहे.
-
अभिनेता जॅकी श्रॉफनेदेखील ३० लाख रुपयांचे घड्याळ भेट केले आहे.
-
अभिनेता अनिल कपूरने १.५ कोटी रुपयांचे ब्रेसलेट भेट म्हणून दिल्याचे म्हटले जात आहे.
-
विराट कोहलीने केएल राहुलला २.१७ कोटी रुपयांची BMW कार भेट म्हणून दिली आहे.
-
तर एमएस धोनीने राहुलला ८० लाखांची कावासाकी निंजा बाईक गिफ्ट दिली आहे.
-
बॉलिवूड आणि क्रिकेट जगताशी संबंधित या जोडीवर शुभेच्छांचा आणि भेटवस्तूंचा वर्षाव झाला आहे.
-
दोघांच्या लग्नाइतकीच त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची देखील चर्चा आहे.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम व इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”