-
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेचा आज वाढदिवस.
-
मराठी चित्रपटसृष्टीतून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या श्रेयसनं बॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
-
जवळपास दीड दशकाच्या त्याच्या अभिनय कारकिर्दीत त्यानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
बॉलिवूडमध्ये ‘ओम शांति ओम’, ‘गोलमाल सीरीज’, ‘वाह ताज’ आणि ‘इकबाल’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात त्याने काम केले.
-
श्रेयसने मराठी सिनेसृष्टीत जवळपास ४५ चित्रपटांत काम केले.
-
श्रेयसनं त्याच्या करिअरमध्ये खडतर काळही पाहिला आहे.
-
श्रेयस हा मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता असला, तरी यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला आहे.
-
श्रेयस तळपदे हा स्ट्रगल करत असताना त्याला सतत स्टुडीओची दारं फिरावी लागायची.
-
अशावेळी तिथे पोहचण्यासाठी बस तिकिटाचे पैसे नसल्याने तो अनेकदा चालत प्रवास करायचा.
-
पण हाच संघर्ष त्याला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेला.
-
त्याने ‘पछाडलेला’, ‘इकबाल’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘आपडी थापडी’, ‘गोलमाल’ अशा अनेक चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या.
-
केवळ चित्रपटच नव्हे तर, मालिका विश्वात देखील तो सक्रिय आहे.
-
श्रेयस तळपदे याने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले.
-
श्रेयसने हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने लाखोंची मने जिंकली आहेत.
-
‘अमानत’, ‘दामिनी’, ‘माय नेम इज लखन’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ अशा मालिकांमध्ये तो झळकला.
-
श्रेयस हा मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार आहे.
-
तो प्रत्येक एपिसोडमागे ४० ते ४५ हजार रुपये मानधन आकारतो.
-
श्रेयस तळपदे हा प्रत्येक चित्रपटासाठी २-३ कोटींचे मानधन घेतो, असे बोललं जातं.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट चांगला हिट ठरला.
-
हिंदी व्हर्जनमध्ये अल्लू अर्जुनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे.
-
अनेक मीडिया रिपोर्टनुसार, श्रेयसने डबिंगसाठीही लाखो रुपये घेतले होते.

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी